Maternity Insurance: बाळाच्या जन्माशी संबंधित खर्च वाढत असल्याने आरोग्य विमा योजनांमध्ये मातृत्व विमा समाविष्ट करण्याकडे सध्या कल वाढला आहे. हा विमा गर्भवती माता आणि बाळाच्या आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक आधार देतो. विमा कंपन्या देखील महिलांच्या बदलत्या गरजेनुसार शिक्षण, करियर प्रगती यांचा विचार करून त्यांच्या योजना बनवीत असतात. अनेक आघाडीच्या विमा कंपन्यांनी मातृत्व विम्यासाठी लागणारी प्रतिक्षेची मुदत 2-3 वर्षांवरून कमी करून 9-12 महिन्यांवर आणली आहे, यामुळे गर्भधारणेदरम्यान आर्थिक मदतीचा जलद लाभ मिळतो.
पालकत्वाचा आर्थिक भार कमी: (Maternity Insurance)
कुटुंबाची स्थापना हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असला तरी त्यासोबत मोठ्या आर्थिक नियोजनाचीही आवश्यकता असते. प्रसूतीपूर्व देखरेख ते प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळातील मदत या सर्व खर्चांमुळे आर्थिक ताण निर्माण होऊ शकते. योग्य विमा संरक्षण नसल्यास, या खर्चामुळे कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
प्रतीक्षा मुदतीचा भार कमी:
मातृत्व आरोग्य विमा योजनांमध्ये साधारणपणे प्रतीक्षा मुदत असते जिथे विमधारकांना योजनांचा पूर्ण लाभ घेण्यापूर्वी ही मुदत पूर्ण करावी लागते. भारतात ही प्रतीक्षा मुदत 9 महिन्यांपासून 4 वर्षांपर्यंत असू शकते. जर तुम्ही पुढील 2 ते 3 वर्षांत कुटुंब नियोजनाचा विचार करत असाल तर गरजेच्यावेळी सर्व लाभ पूर्णपणे उपलब्ध करण्यासाठी मातृत्व आरोग्य विमा योजना घेणे चांगले. याशिवाय, विम्यात अविवाहित जोडपे यांच्यासाठीही विमा योजना उपलब्ध आहेत. इथे लग्नानंतर, जोडीदाराचे नाव जोडले जाऊ शकते आणि प्रतीक्षा कालावधी विमा घेतलेल्या दिवसापासून सुरू होतो.
व्यापक संरक्षण:
हे संरक्षण केवळ आवश्यक वैद्यकीय खर्चासाठीच लागू होत नाही तर ते गर्भधारणा आणि प्रसूतीच्या पलीकडे जन्मानंतरच्या खर्चाचाही समावेश करते(Maternity Insurance). आरोग्य विमा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित होत असल्याने, अनेक योजना अतिरिक्त मदत प्रदान करतात, जसे की पूर्ण झालेली प्रतीक्षा मुदत जोडीदाराला हस्तांतरित करण्याची सोय. ही सुविधा कुटुंब नियोजनासाठी उपयुक्त ठरते.