Kotak Mahindra Shares: रिझर्व्ह बँकेन (RBI) ने ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन खातेधारकांचे ग्राहक बनवण्यावर बंदी घातल्यामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी घसरण झाली. या घसरणीनंतर बँकेच्या शेअरची किंमत 10.85 टक्क्यांनी घसरून BSE वर 1,643 वर येऊन पोहोचली.
कोटक महिंद्राचे शेअर्स घसरले: (Kotak Mahindra Shares)
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये झालेली घसरण ही बँकेच्या Market Cap वर देखील झळकली. गुरुवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत बँकेच्या बाजारपेठेच्या किंमतीत 39,768.36 कोटीची घट झाली आणि गुरुवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत ही किंमत 3,26,615.40 कोटींवर पोहोचली होती.
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांच्याकडे बँकेचा 25.71 टक्के इतका वाटा आहे आणि एका दिवसात झालेल्या या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत सुमारे 10,225 कोटींची घट झाली आहे. शिवाय Mutual Fund कडे बँकेच्या 12.82 टक्के वाटा आहे आणि या घसरणीमुळे Mutual Fundचे सुमारे 5,000 कोटींहून अधिकचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
विमा कंपन्यांची या बँकेत 8.69 टक्के गुंतवणूक आहे, ज्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) 6.46 टक्के वाटा आहे. या घसरणीमुळे विमा कंपन्यांचे सुमारे 3,456 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे(Kotak Mahindra Shares) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचेही या घसरणीमुळे सुमारे 2,569 कोटींचे नुकसान झाले आहे.
तज्ञांच्या मतानुसार येत्या काळात कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्व गुंतवणदारांना होणारा नफाही मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.