Jim Simons: वयाच्या 86 व्या वर्षी गणितज्ञ जिम सिमन्स यांचे निधन

Jim Simons: जिम सिमन्स यांचं अचानक निधन झालं आहे. ते एक गणितज्ञ होते. 1980च्या दशकात त्यांनी आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आणि संगणक आधारित विश्लेषण पद्धती (Quantitive Approach) विकसित केली. या पद्धतीमुळे गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्यांनी मोठी क्रांती घडून आली. सध्या त्यांची टीम आणि ते Trading Algorithm आणि Artificial Intelligence चा वापर करून गुंतवणूक क्षेत्रात सातत्याने चांगला परतावा मिळवण्यात यशस्वी ठरत होते, वॉरेन बफेट आणि जॉर्ज सोरोस या दिग्गज गुंतवणूकदारांपेक्षाही त्यांना मिळणार परतावा अधिक होता.

गणितज्ञांचे निधन:(Jim Simons)

जिम सिमन्स यांनी रेनेसां हे जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी हेज फंड्सपैकी एका फंडची स्थापना केली. त्यांच्या मेडलियन फंडाने गेल्या तीन दशकांत सरासरी 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला होता. पुढे त्यांनी 2010 मध्ये या फंडच्या CEO पदावरून आणि 2021 मध्ये अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली. फोर्ब्सच्या माहितीनुसार, त्यांची अंदाजे संपत्ती 34 अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे 2.84 लाख कोटी रुपये) च्या आसपास होती.

नंतर सिमन्स यांनी वैद्यकीय, शास्त्रीय संशोधन आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रात अब्ज डॉलर्सची देणगी दिली (Jim Simons). तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली. गणित क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2022 मध्ये एबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं होतं.

Leave a Comment