ITR Filling: भारताच्या अर्थ विभागानं2023-24 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 अशी असल्याने शेवटच्या क्षणी थांबण्यापेक्षा आताच कर विवरणपत्र भरणं तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. विभागाकडून यावेळी सर्वाधिक वापरल्या जाणार्या ITR-1 फॉर्म अंतर्गत कर भरणार्यांसाठी विशेष बदल करण्यात आले आहेत. हा Form-50 लाख रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निवासी व्यक्तींसाठी आहे.
ITR-1 मध्ये महत्वाचे बदल: (ITR Filling)
- नवीन करव्यवस्था (New Tax Regime): विभागाने ITR-1 भरणार्यांसाठी नवीन करव्यवस्थेला डिफॉल्ट पर्याय बनवले आहे. यामध्ये व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब (HUF), व्यक्तींचे संघ (AOP) आणि व्यक्तींचा समूह (BOI) यांचा समावेश होतो. जर तुम्हाला जुनी करव्यवस्था निवडायची इच्छा असेल तर तुम्हाला Form 10-IEA भरून स्पष्टपणे नकार द्यावा लागेल आणि जर तुम्हाला जुनी करव्यवस्था पसंत असेल तर तुम्हाला Form १०-IEA भरून स्पष्टपणे निवडणूक करावी लागेल.
- कलम 80 CCH मध्ये काट: अग्निपथ योजनेत दाखल झालेल्या व्यक्तींसाठी यंदा नवीन कटौतीचा समावेश करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर अग्निवीर कोषात सदस्यता घेणाऱ्यांना जमा केलेल्या संपूर्ण रकमेवर कर कटौतीचा दावा करता येईल(ITR Filling). ITR-1 मध्ये आता या योगदानाची नोंद करण्यासाठी एक विशेष विभाग समाविष्ट करण्यात आला आहे.