ITR Filing 2024: ITR भरण्याची प्रक्रिया सुरु; काही मिनिटातच डाउनलोड करा फॉर्म

ITR Filing 2024: देशवासियांनो लक्ष्यात घ्या, आपल्या देशात आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण फॉर्म 16 उपलब्ध न झाल्याने अनेक करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत. फॉर्म 16 तुमच्या उत्पन्नाची, तुम्हाला मिळालेल्या पगाराची आणि किती कर कपात करण्यात आली आहे याची माहिती देतो. अशाप्रकारे, ITR भरताना हा फॉर्म अधिक महत्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे फॉर्म 16A आणि 27D देखील ITR साठी महत्त्वाचे आहेत.

फॉर्म 16, 16A आणि 27D म्हणजे काय? (ITR Filing 2024)

  • फॉर्म 16 हा एक असा दस्तावेज आहे ज्यामध्ये आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म जारी करणे बंधनकारक आहे. कंपन्या सामान्यतः मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या मध्यापर्यंत दरवर्षी त्यांच्या कर्मचार्यांना फॉर्म 16 जारी करतात.
  • फॉर्म 16A मध्ये कपात केलेल्या TDS आणि नियोक्त्याच्या PAN, TAN आणि इतर माहितीचे त्रैमासिक विवरण असते.
  • 27D हा तीन महिन्यांची माहिती देणारा फॉर्म आहे. करदात्यांनी सरकारला कर भरला आहे की नाही हे त्यातून कळते. त्यामुळे ITR भरताना हे दस्तावेज महत्वाचे ठरतात.

तुम्हीही ITR भरणार असाल आणि तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल किंवा तुम्हाला फॉर्म 16A आणि 27D ची आवश्यकता असेल तर तुम्ही ते कसे सहज मिळवू शकता, कंपन्या साधारणपणे मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा 15 जूनपूर्वी हा फॉर्म जारी करतात.

हे फॉर्म कोठून डाउनलोड करू शकता?

वेतनधारी कर्मचारी ज्या आर्थिक वर्षात कर कपात केली जाते त्याच्या पुढील वर्षाच्या 15 जून पर्यंत किंवा त्यापूर्वी कंपनीकडून फॉर्म 16 गोळा करू शकतात किंवा फॉर्म 16 TRACES Website वरून डाउनलोड केला जाऊ शकतो.

  • TRACES वेबसाइट www.tdscpc.gov.in/en/home.html वर जा.
  • आता ‘Log In’ विभागात जा आणि Drop Down मधून ‘Tax Payer’ हा मार्ग निवडा.
  • User ID, पासवर्ड आणि PAN द्वारे Log In करा.
  • ‘Tax Credit’ पहा किंवा ‘Verify’ विभागात जा.
  • ‘Provisional TDS प्रमाणपत्र 16/16A/27D’ निवडा.
  • एक पान उघडेल, येथे तुम्हाला तुमच्या नियोक्त्याचा TAN, आर्थिक वर्ष, ज्या तिमाहीसाठी विनंती केली आहे त्या तिमाहीची माहिती भरावी लागेल.
  • ‘Provisional Certificate Type’ च्या dropdown अंतर्गत, From 16, 16A, 27D पैकी डाउनलोड करायचा फॉर्म निवडा.

Leave a Comment