IRT Filing 2024: करदात्यांनो तुमच्यासाठी कोणता ITR Form योग्य? हे तपासून घ्या

IRT Filing 2024: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक वर्ष 2023-24 च्या कर भरण्याच्या प्रक्रियेसाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ITR फॉर्म 1,2,3,4,5 आणि 6 उपलब्ध करून दिले आहेत. करदाते हा फॉर्म वापरून त्यांचे उत्पन्न आणि कर भरण्याची माहिती विभागाला सादर करू शकतात आणि यंदा कर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै अशी निश्चित करण्यात आली आहे.

आयकर विभागाकडून Forms जारी: (IRT Filing 2024)

आयकर विभागामार्फत 6 Income Tax Return Forms (ITR Forms) जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक असल्याकरणारे प्रत्येकाला सरकारी तिजोरीत आयकराची रक्कम भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र आपण नेमका कोणता फॉर्म भरावा असा प्रश्न अनेक करदात्यांना सतावतो. विभागाकडून सहा प्रकारचे फॉर्म्स जारी करण्यात आले असले तरीही हे सहा फॉर्म वेगवेगळ्या करदात्या वर्गांसाठी आहेत आणि आपल्याकडून अनावधानाने चुकीचा फॉर्म भरला जाऊ नये म्हणून याची माहिती आपल्याला असणे महत्वाचे आहे.

ITR 1

हा फॉर्म 50 लाख रुपयेपर्यंत एकूण उत्पन्न असलेल्या रहिवासी व्यक्तींना (other than not ordinarily resident) लागू होतो. यामध्ये वेतन, एका मालमत्तेपासून उत्पन्न, इतर स्त्रोतांकडून उत्पन्न तसेच 5,000 रुपयेपर्यंतचा शेती उत्पन्न यांचा समावेश होतो. लक्षात ठेवा की, व्यवसाय किंवा नोकरीपासून उत्पन्न मिळत असल्यास तसेच एकापेक्षा जास्त मालमत्तेपासून उत्पन्न मिळत असल्यास ITR 1 भरता येत नाही.

ITR 2

हा फॉर्म वेतन/Pension, मालमत्ता आणि इतर स्त्रोतांकडून उत्पन्न मिळत असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) यांच्यासाठी लागू होतो. ज्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करून विकली आहे, भांडवली नफा मिळवला आहे किंवा परदेशी उत्पन्न मिळवले आहे अशा लोकांना ITR 2 दाखल करणे आवश्यक आहे.

ITR 3

व्यवसाय किंवा व्यावसायातून नफा आणि उत्पन्न मिळत असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी हा फॉर्म आहे.

ITR 4

हा फॉर्म 50 लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) आणि फर्म (other than Limited Liability Partnership) यांसोबतच कलम 44 AD, 44 ADA किंवा 44 AE अंतर्गत गणना केले जाणारे व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्न तसेच 5,000 रुपयेपर्यंतचा शेती उत्पन्न असलेल्यांसाठी आहे.

ITR 5

हा फॉर्म फर्म, LLP, AOP (Association of Persons), BOI (Body of Individuals), कृत्रिम न्यायिक व्यक्ती (Artificial Juridical Person ), मृत्यू पावलेल्यांची मालमत्ता, दिवाळखोर मालमत्ता, Business Trust आणि investment fund यांच्यासाठी आहे (IRT Filing 2024).

ITR 6

ITR 6 फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरता येतो. कलम 11 (Income from property held for charitable or religious purposes) अंतर्गत सूट मिळविण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांसाठी हा ITR बनवला गेला आहे.

Leave a Comment