Iran President Death: इराणच्या राष्ट्रपतींचा दुर्घटनेत मृत्यू; भारतासाठी आहे का धोक्याची घंटा?

Iran President Death: इराणमध्ये थक्क करणारी घटना घडली. राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन आमिर-अब्दोल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आणि या घटनेमुळे इराणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या नेत्यांच्या अचानक निधनामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

भारतीयांवर असा होणार परिणाम: (Iran President Death)

हेलिकॉप्टर दुर्घटनेची बातमी समोर येताच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात खळबळ उडाली. सोमवारी आशियाई बाजारपेठेत तेलच्या किमतींमध्ये वाढ झाली. जुलै महिन्यासाठीच्या ब्रेंट क्रूडच्या किमती 0.3 टक्क्यांवरून वाढून 84.19 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. अमेरिकेच्या क्रूडच्या किमतींमध्येही 0.2 टक्क्यांची वाढ झाली आणि ती 79.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात तेल बाजारात आणखी चढउतार होण्याची शक्यता आहे आणि यापुढे तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

रायसी यांच्या निधनामुळे सोनेच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे.आपल्याकडे सोने हे एक सुरक्षित गुंतवणूकचे साधन मानले जाते. परिणामी सोन्याला सतत मागणी असते, मात्र या घटनेनंतर तज्ज्ञांच्या मते इराणमध्ये राजकीय स्थिरता प्राप्त होईपर्यंत सोन्याच्या किमती वाढत राहण्याची शक्यता आहे(Iran President Death). या घटनेचा प्रभाव इथेच थांबत नाही तर यात शेअर बाजार देखील सामावलेला आहे, भविष्यात यामुळे बाजारात बऱ्यापैकी चढ-उतार पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment