Investment For Girl Child: मुलीचे भविष्य घडवण्यासाठी “सुकन्या समृद्धी” सोडून पर्याय कोणते?

Investment For Girl Child: तुमच्या घरात मुलगी लहानाची मोठी होत आहे का? आणि तिच्या वाढत्या वयाकडे बघता तुम्हला तिच्या भविष्याची चिंता देखील नक्कीच सतावत असेल. आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून पालक या नात्याने आपण अनेक गोष्टी करतो. त्यांना चांगले शिक्षण देणे, संस्कार देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र त्यांचे भविष्य सुखकर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आर्थिक नियोजन करणेही महत्त्वाचे आहे.

मुलीचे भविष्य घडवा: (Investment For Girl Child)

आपल्याकडे निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना आपण अनेक पर्यायांचा विचार केला जातो आणि विविध गुंतवणूक पर्यायांची मदत देखील घेतली जाते मात्र, मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना अनेकदा आपण फक्त एकाच योजनेवर अवलंबून राहतो आणि हे चुकीचे आहे. मुलींच्या भविष्यासाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

मुलींच्या दीर्घकालीन भविष्यासाठी सुकन्यासमृद्धी योजना (SSY) हा लोकप्रिय पर्याय समाजाला जातो किंबहुना पसंत केला जातो आणि यात काहीही चूक नाही कारण या योजनेत मुलीच्या जन्मापासून 10 वर्षांपर्यंत दर महिन्याला किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1500 रुपये जमा करता येतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला परिपक्व रक्कम मिळते आणि ही योजना करमुक्त आहे.

जर का तुम्ही देखील सुकन्या समृद्धी योजनेचे लाभार्थी असाल तर खरोखर हा उत्तम पर्याय आहे, मात्र मुलींच्या भविष्यासाठी फक्त SSY योजना पुरेसी नाही. वाढत्या महागाईमुळे मुलींच्या उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी अधिक निधीची आवश्यकता असू शकते. म्हणूनच इतर गुंतवणूक पर्यायांचाही विचार करणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीचे इतर प्रकार:

आर्थिक तज्ज्ञांच्या मते गुंतवणुकीची चार स्तंभ म्हणजे इक्विटी,कर्ज, सोने आणि रिअल इस्टेट. गुंतवणूक करताना वेगवेगळ्या पर्यायांचा समावेश (asset allocation) आणि विविधीकरण (asset diversification) या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दीर्घकालीन आर्थिक भरभराटीसाठी Equity Linked Instrument (थेट इक्विटी, ETF, म्युच्यूअल फंड आणि यूलिप) उपयुक्त ठरतात.

नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी Date Linked Instruments (बँकेची मुदत ठेव, Corporate FD, NCD, म्युच्यूअल फंड) उपयुक्त ठरतील(Investment For Girl Child). शिवाय सोने हे इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा वेगळे असते आणि त्याचे मूल्य दीर्घकाळात वाढण्याची शक्यता असते आणि सोने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जाते. सर्वात शेवटी आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून उत्पन्न मिळवू शकता हे लक्ष्यात ठेवा.

Leave a Comment