MoneyInvestmentPersonal FinanceSaving

Infosys Dividend: Infosysच्या अंकांमध्ये सकारात्मक वाढ; लवकरच जाहीर करणार लाभांश

Infosys Dividend: भारतातील आघाडीची IT कंपनी Infosys ने मार्च 2024 ला चौथ्या तिमाहीचा जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केला आहे. या निकालांमध्ये नफा आणि उत्पन्न दोघांमध्येही चांगली वाढ दर्शवली गेली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 6,128 कोटी रुपये नफा कमावल्यानंतर, यंदाच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 7,969 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीतील 37,441 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा उत्पन्न 1.3 टक्क्याने वाढून 37,923 कोटी रुपये इतके झाले आहे.

कंपनी जाहीर करणार लाभांश: (Infosys Dividend)

Infosysच्या संचालक मंडळाने FY24 साठी शेअरमागे 20 रुपये अंतिम लाभांश आणि 8 रुपये विशेष लाभांश असा, मिळून एकूण 28 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांशाच्या रेकॉर्डची तारीख 31 मे 2024 असून हा लाभांश 1 जुलै 2024 रोजी दिला जाईल.

चौथ्या तिमाहीत झालेल्या नफा आणि उत्पनाच्या वाढीमुळे Infosysची FY24 ची कामगिरी चांगली राहिली आहे. सध्या कंपनीकडून डिजिटल रूपांतरणावर भर दिला जात असल्याने कंपनीला याचा फायदा मिळतोय. या अंकांमुळे Infosys कंपनीच्या भविष्याबद्दल सकारात्मक असून FY25 साठी स्थिर चलनात मधील 1-3 टक्के उत्पन्न वाढीची अपेक्षा केली जातेय.

शेअर किंमतीची हालचाल:

18 एप्रिल 2024 रोजी BSE वर Infosysचा शेअर 1,429.50 रुपयांवर बंद झाला, ज्यात मागील दिवसापेक्षा 1.06 टक्क्यांची वाढ झाली आहे(Infosys Dividend). कंपनीचे हे निकाल शेअर बाजारासाठी सकारात्मक असून, येत्या काही दिवसांत गुंतवणुकदार कंपनीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Related Articles

2 Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button