Income Tax Return: ITR भरताना घडणाऱ्या “या” प्रमुख चुका टाळा..

Income Tax Return: कर भरणं ही एक क्लिष्ट गोष्ट आहे, ज्यात एखादी झालेली चूक देखील पुढे जाऊन भरपूर त्रासदायक ठरू शकते, म्हणूनच कर भरण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घेणं चांगलं. सध्या ITR भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून या लेखात आपण कर भरण्याच्या काही सामान्य चुका आणि त्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे पाहुयात…

1. चुकीचा फॉर्म निवडणे:

कर भरताना सर्वात जास्त होणारी चूक म्हणजे चुकीचा फॉर्म निवडणे. प्रत्येक फॉर्म हा विशिष्ट उत्पन्नासाठी आणि करदात्यांसाठी बनलेला असतो आणि अनावधानाने चुकीचा फॉर्म वापरण्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, परिणामी कर भरण्यात विलंब होऊ शकतो. ही चूक सुधारण्यासाठी करदात्यांनी प्रत्येक फॉर्मची पात्रता नीट समजून घ्यावी आणि शंका असल्यास सल्लागारांशी चर्चा करावी.

2. F&O व्यवहारांची योग्य मांडणी: (Income Tax Return)

F&O म्हणजेच Futures and Options, यांचे व्यवहार कर भरताना थोडे गुंतागुंतीचे वाटू शकतात. F&O मध्ये व्यवहारांमधील नफा आणि तोटा दोन्ही कर विवरणपत्रात योग्य प्रकारे दाखवणे गरजेचे आहे. असं केलं नाही तर कर विभागाकडून नोटीस येऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो.

3. दान करताना योग्य काळजी:

आयकर अधिनियमाच्या कलम 80G अंतर्गत संस्थांना केलेल्या देणग्यांवर कर कपात मिळू शकते. त्यामुळे योग्य कागदपत्रांशिवाय दान कपातीचा दावा करता येत नाही. करदात्यांना जर का ही सवलत पाहिजे असेल तर त्यांनी पात्र संस्थांना देणगी देऊन पावती मिळवणे अनिवार्य आहे.

4. ESOP ची योग्य माहिती:

Employee Stock Ownership Plans (ESOP) मध्ये Restricted Stock Units (RSUs) चा समावेश असतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांना कराच्या बाबतीत काही विशेष समस्या येऊ शकतात म्हणूच करदात्यांनी त्यांचे ESOP कर नियमांनुसार आहेत याची खात्री करण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.

5. एकापेक्षा जास्त नोकरीची गणना:

एका वर्षात अनेकदा नोकरी बदलणाऱ्या करदात्यांना प्रत्येक नोकरीमधून मिळालेले उत्पन्न कर विवरणपत्रात अचूकपणे दाखवणे गरजेचे आहे. कर फॉर्ममध्ये चुका टाळण्यासाठी प्रत्येक नोकरीमधून मिळालेल्या पगार, बोनस आणि भत्ते यांची सविस्तर माहिती ठेवावी.

Leave a Comment