Google Wallet App: महत्वाची कागदपत्रे जपून ठेवण्यात Google करणार मदत

Google Wallet App: आपल्या सर्वांनाच आपल्या दैनंदिन जीवनात विविध Cards, Tickets आणि पास सांभाळावे लागतात आणि यात आपलीच दमछाक उडते. हो ना? विमान प्रवासाच्या बोर्डिंग पासपासून ते सिनेमाच्या तिकीटांपर्यंत, ही सर्व कागदपत्रे सांभाळणे आणि आयत्यावेळी ती हाताजवळ मिळणे कठीण असते. पण काळजी करू नका आता ही समस्या दूर होणार आहे, कारण Google ने भारतात त्यांचं Google Wallet App बाजारात आणले आहे.

गुगलने आणले नवीन App:(Google Wallet App)

या नवीन Google Wallet चा वापर म्हणजे तुमच्या सर्व महत्वाच्या डिजिटल गोष्टी एका जाग्यावर जमा करण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये बोर्डिंग पास, loyalty card, सिनेमा तिकीटं, Event Pass आणि बरेच काही जवळ करून ठेऊ शकता. त्यामुळे आता तुम्हाला अनेक कागदपत्र एकत्र सांभाळून ठेवण्याची झंझट सतावणार नाही. अगदी तुमची ऑफिसची ओळखपत्र असो वा तुमच्या घराच्या सोसायटीचे Entry Card, Google Wallet अश्या सर्व गोष्टी डिजिटल स्वरुपात साठवून ठेवण्याची सुविधा देईल.

मात्र लक्ष्यात असुद्या की Google Wallet हे Google Pay पेक्षा वेगळे आहे. Google Pay भारतात आधीपासूनच पेमेंट करण्यासाठी वापरले जात होते आणि ती सुविधा आताही तशीच चालू राहील. दुसऱ्या बाजूला Google Wallet (Google Wallet App) च्या वापराने तुम्ही दररोज लागणारी महत्वाची कागदपत्र जपून ठेऊ शकता.

Leave a Comment