Google Layoffs: गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपल्या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनीने किमान 200 कर्मचाऱ्यांची कपात केलेली पाहायला मिळते. हे कर्मचारी मुख्यत्वे कंपनीच्या “Core” टीममध्ये कार्यरत होते. या “Core” टीमची जबाबदारी कंपनीच्या मुख्य उत्पादनांचा पाया मजबूत करणे आणि वापरकर्ते ऑनलाइन सुरक्षित राहतील याची खात्री करणे अशी होती. मात्र या बदलानंतर आता कंपनीने ही कमी केलेली पदं मेक्सिको आणि भारतात हलविण्याचा विचार सुरु केला असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
गुगल हलवणार प्रमुख पदं? (Google Layoffs)
या कोअर टीममध्ये माहिती तंत्रज्ञान, Python Developer Team, तांत्रिक पायाभूत सुविधा, सुरक्षा विभाग, App Platform, मुख्य डेव्हलपर्स आणि विविध अभियांत्रिकी भूमिकांचा समावेश होतो. आणि कंपनीने केलेल्या या बदलांमुळे अमेरिकेच्या California मधील सुनीवेल येथील कार्यालयात किमान 50 अभियांत्रिकी पदांवरचा पदभार हटवण्यात आला असून कंपनीने ही कमी केलेली पदं मेक्सिको आणि भारतात हलविण्याचा विचार कारत असल्याची माहिती समोर आली आहे.
या बदलांबाबत गुगलच्या Developer Ecosystem चे वरिष्ठ उपाध्यक्ष आसिम हुसैन यांनी आपल्या टीमला ईमेलद्वारे ही कपात कंपनीने एक मोठे ध्येय सध्या करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उघड करत कंपनीची बाजू स्पष्ट केली. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेला (Artificial Intelligence) आपल्या उत्पादनांमध्ये अधिकाधिक समाविष्ट करत असल्यामुळे हा बदल मुख्यत्वे Developer Tools शी संबंधित टीमवर परिणाम करेल.
दुसरीकडे, गुगलच्या सुरक्षा अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंकज रोहाटगी यांनी कंपनी इतर ठिकाणी आपले कार्यक्षेत्र वाढवत असल्यामुळे काही जागा हटवल्या जात असल्याचे जाहीर केले.
भारताला फायदा कसा?
या बदलांमुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता असली तरी, भारतासारख्या देशात मात्र यामुळे काही नवीन नोकरीची संधी निर्माण होऊ शकतात (Google Layoffs). गुगल भारतासारख्या बाजारपेठांवर अधिक लक्ष देत असून येथील संधींचा फायदा घेऊन काही पदं भारतात हलविण्याचा कंपनीचा विचार आहे.