Google CEO: “मिळालेल्या यशात पालकांचा वाट मोठा”; बालपणाबद्दल बोलनातन पिचाई म्हणाले….

Google CEO: जगभरातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच गूगलचे CEO आणि भारतीयांचे अभिमान असलेले सुंदर पिचाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान ते म्हणाले की “मी देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलोय. आम्ही एका लहानशा घरात राहत होतो, जिथं सुविधांची कमी होती.” यासोबतच त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांनी तंत्रज्ञानाला कधीही हलक्यात घेतलं नाही आणि यात नेहमीच त्यांना पालकांची मदत मिळत राहिली.

चेन्नईमधला जन्म आणि पालकांची साथ: (Google CEO)

1972 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेले आणि IIT खरगपूरमधून शिक्षण घेतलेले सुंदर पिचाई याची ओळख सध्या जगभरात पसरली आहे. व्हार्टन येथून MBA पूर्ण केल्यानंतर ते 2004 मध्ये गूगलमध्ये रुजू झाले आणि 2015 मध्ये त्यांना गूगलच्या मूळ कंपनी Alphabet Inc. चे CEO बनवण्यात आले. सुंदर पिचाई म्हणतात की, त्यांच्या पालकांनी नेहमीच त्यांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले आणि त्यावर कधीही तडजोड केली नाही. यासोबतच त्यांनी अभ्यासाबरोबरच त्यांना तंत्रज्ञानाशी जोडून ठेवले, त्यामुळे आज मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा पालकांचा आहे असं त्यांचं ठाम मत आहे.

बालपणातील दिवसांना उजाळा देताना ते म्हणाले की, “पहिला टेलिफोन येण्यासाठी मला तब्बत पाच वर्षे वाट पाहावी लागली, तेव्हाच घरात पहिला रेट्रो फोन घरात आला. मग त्याचा प्रभाव आम्हाला कळला. इतकेच नाही, काही दिवसांनी घरात टेलिव्हिजनही आले.” CEO यांच्या मते त्याकाळात भारतीय घरात टीव्ही आणि टेलिफोन असणे हे एक मोठे दिव्यच समजले जायचे.

गूगलचे CEO सुंदर पिचाई हे अनेक भारतीय तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. त्यांचा चेन्नई ते अमेरिकेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. 2015 मध्ये गूगलच्या CEO पदावर रुजू झाल्यानंतर, त्यांच्या बालपणाच्या अनुभवांचा प्रभाव फक्त त्यांच्या Work Ethic वरच नाही तर संपूर्ण कंपनवर दिसून आला आहे, असे स्वतः पिचाई यांनी सांगितले.

AI बद्दल काय म्हणाले पिचाई?

सदर चर्चेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही गूगल सर्च कसा प्रासंगिक आहे हे पिचाई यांनी समजावून सांगितले. सुंदर पिचाई म्हणाले, “आज कृत्रिम बुद्धिमत्ता हळूहळू गूगलसारख्या शोध इंजिनांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु येणाऱ्या काळात फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेलाच नाही तर दोघांनाही बरोबरचे स्थान मिळणार आहे.”

आजच्या जगात अनेक लोकांना त्वरित माहिती हवी असतेच, मात्र सोबतच ते आणखीन पूरक माहितीच्या शोधात असतात(Google CEO). सुंदर पिचाई यांच्या या विधानांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही गूगल सर्चची जागा घेणार नाही तर त्याला पूरक ठरणार आहे, त्यामुळे कदाचित भविष्यात आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे Search Engine आणि Google Search यांचे मिश्रण पाहायला मिळेल.

Leave a Comment