Goa Airport: गोव्याच्या मोपा विमानतळावर वीज कोसळल्याने विमानं वळवली

Goa Airport: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाळी वातावरण पाहायला मिळते. अश्यातच काल म्हणजेच बुधवारी 22 मे रोजी संध्याकाळी गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरण्यासाठी आवश्यक असलेले धावपथाच्या बाजूचे दिवे वीज कोसळल्यामुळे खराब झाले. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाला सहा विमाने जवळच्या विमानतळांवर वळवावी लागली होती.

मोपा विमानतळावर खळबळ: (Goa Airport)

घडलेल्या प्रकाराची माहिती देताना विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास मोपा विमानतळावर वीज कोसळली आणि यामुळे धावपथाच्या कडेचे दिवे निकामी झाले. विमान सुरक्षितपणे उतरू शकतील याची खात्री करण्यासाठी रात्री 8 वाजेपर्यंत Notice to Air Men जारी करण्यात आली होती. या कालावधीत दिवे दुरुस्त करण्याचे आणि बदलण्याचे काम सुरू होते.”

NOTAM जारी असताना सहा विमानांना जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. विमानतळ प्रशासनाने या गैरसोयीबद्दल दिलगी व्यक्त केली आहे. अशा नैसर्गिक आपत्ती आमच्या हातात नाहीत, मात्र झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोपा विमानतळावर ही घटना घडल्याने काही प्रवाशांचे प्रवास वेळापत्रक बिघडले मात्र विमानतळ प्रशासनाने दिवे दुरुस्त करण्याचे आणि बदलण्याचे काम त्वरित केल्याने रात्री 8 वाजेपर्यंत विमानतळावरील कारवाई पूर्वपदावर आली होती(Goa Airport). विमानतळ प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोपा विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता विशेष चिंता करण्याची गरज नाही.

Leave a Comment