Go Digit IPO: गुंतवणूकदारांनी लक्ष्यात घ्या की सध्या भारतीय बाजारात IPOची संख्या वाढत चालली आणि ही तुमच्यासाठी गुंतवणुकीची उत्तम संधी ठरू शकते. याच IPO चा एक भाग म्हणून, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या Go Digit Insurance Company ने IPO गुंतवणुकदारांसाठी खुला केला आहे. आज म्हणजेच 15 मे रोजी सुरू झालेल्या या IPO द्वारे गुंतवणुकदारांना वेगानं वाढणाऱ्या विमा कंपनीचा एक भाग होण्याची संधी मिळणार आहे.
विराट कोहलीची गुंतवणूक: (Go Digit IPO)
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे Go Digitच्या भागधारकांपैकी एक आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये विराट कोहलीने 2 कोटी रुपये गुंतवून 75 रुपये प्रति शेअर दराने 2,66,667 शेअर्स खरेदी केले होते, तर दुसऱ्या बाजूला अनुष्का शर्माने 50 लाख रुपये गुंतवून त्याच दराने 66,667 शेअर्स विकत घेतले होते.
Go Digit चे विमा उत्पादन:
Go Digit विविध प्रकारचे विमा उत्पाद प्रदान करते. यामध्ये वाहन, आरोग्य, प्रवास, मालमत्ता, मालवाहतूक आणि Liability यांचा समावेश होतो. Go Digit ला मार्च 2024 मध्ये भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडून IPO खुला करण्याची परवानगी मिळाली होती.
Go Digit चा IPO हा भारतातील आघाडीच्या विमा कंपनीमध्ये सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना देतो. मजबूत ब्रँड आणि प्रसिद्ध क्रिकेटपटूचा पाठिंबा असलेली Go Digit ही कंपनी विविध प्रकारे गुंतवणूक करू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो, मात्र तरीही कोणतीही गुंतवणूक करताना मार्गदर्शकांचा सल्ला नक्कीच घ्यावा.
Go Digit IPO तपशील:
- विक्रीसाठी असलेले एकूण शेअर्स – 2,614.65 कोटी रुपये
- नवीन समभाग विक्री – 1,125 कोटी रुपये (9,61,26,686 नवीन शेअर्स)
- ऑफर फॉर सेल (OFS) – 1,489.65 कोटी रुपये (5,47,66,392 विद्यमान शेअर्स)
- किंमत बँड – 258 ते 272 रुपये प्रति शेअर
- लॉट आकार – 55 शेअर्स (कमीत गुंतवणूक रक्कम – 14,960 रुपये)
- गुंतवणूक बंद होण्याची तारीख – 17 मे 2024