Ghost Malls in India: केवळ एका वर्षात भारतामधल्या ‘Ghost Malls’ च्या संख्येत चिंताजनक वाढ

Ghost Malls in India: भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या एक वेगळीच समस्या निर्माण होत आहे. आपल्यासाठी नेहमीच गजबजलेले, चांगल्या कपड्यांनी सजलेले, खाण्यापिण्याच्या दुकानांनी भरलेले Shopping Malls आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. अश्या ठिकाणी वेळ घालवायला, विविध वस्तू बघायला आणि खरेदी करायला या Shopping Malls मध्ये रांगा लागलेल्या असतात. मात्र भारतात काही ठिकाणी हे चित्र बदलले असून काही ठिकाणी आता केवळ शांताता बाकी आहे, आणि म्हणूनच अश्या Malls ना Ghost Malls म्हटलं जातंय.

भारतात Ghost Malls ची वाढ: (Ghost Malls in India)

खरं तर, भारतातील अनेक शहरांमध्ये अशी रिकामी पडलेली Malls ची संख्या वाढत आहे. Night Frank India या रिअलस्टेट कंपनीने सादर केलेल्या ‘Think India Think Retail 2024’ या अहवालानुसार, वर्ष 2023 मध्ये भारतात अशा Ghost Malls ची संख्या 57 वरून थेट 64 पर्यंत वाढली आहे. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या Shopping Malls मुळे अर्थव्यवस्थेला काही नुकसान सोसावे लागत आहे का? तर याचं उत्तर आहे हो!! या विषयी चिंताजनक बाब म्हणजे यामुळे आपल्या देशात एकूण 6,700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे ‘Ghost Malls’ म्हणजे काय?

आत्ताच्या घडीला देशात 40 टक्क्यांपेक्षा जास्त दुकाने रिकामी असलेली Malls म्हणजे Ghost Malls होय. हे Malls पूर्णतः बंद असू शकतात किंवा काही भागातच दुकाने आर्थिक व्यवहार करताना आढळून येतात. अहवालानुसार, एकूण 64 Ghost Malls पैकी 21 दिल्ली-NCR मध्ये आहेत. त्यानंतर बंगळुरूमध्ये 12, मुंबईमध्ये 10 कलकत्त्यात 6, हैदराबादमध्ये 5, अहमदाबादमध्ये 4 तर पुणे आणि चेन्नईमध्ये प्रत्येकी 3 असा क्रम समोर आला आहे.

Online Shopping वाढल्यामुळे लोकांना Malls ची तशी गरज राहिले नाही. किंवा अनेकवेळा Malls चांगल्या स्थानी किंवा ठिकाणी नसल्याने, तसेच तेथील डिझाइन आकर्षक नसल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे (Ghost Malls in India). आर्थिक मंदीमुळे लोकांची खरेदीची क्षमता कमी झाल्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे Malls ची कमाई कमी झाली असे म्हणायला हरकत नाही. मात्र लक्षात घ्या ही स्थिती जर का कायम राहिली तर अनेक नोकऱ्या जातील, Malls ची मालकी असलेल्यांचं आणि दुकानांचं आर्थिक नुकसान होईल, तसेच जमीनीच्या किमतीवरही परिणाम होण्याची शक्यात आहे.

Leave a Comment