EPF Withdrawal Limit: EPF ने बदलले नियम; आता दुप्पट रक्कम काढणे शक्य

EPF Withdrawal Limit: आनंदाची बातमी! कष्टकरी मंडळींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक महत्वाची बातमी घेऊन आली आहे. EPFO कडून PF खात्याच्या संधर्भात काही बदल केलेले असल्याने कष्टकरी मंडळींना फायदा मिळणार आहे. या पीएफच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तुम्ही आता दुप्पट रक्कम काढू शकणार आहात. आश्चर्यचकित झालाय? तर ही बातमी नक्कीच वाचा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा..

EPF ने बदलले नियम: (EPF Withdrawal Limit)

EPF कडून करण्यात आलेल्या बदलांमध्ये वैद्यकीय प्रकरणांसाठी आगाऊ रक्कम काढण्याची मर्यादा 50,000 रुपयांवरून वाढवून ती 1,00,000 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी जारी झालेल्या परिपत्रकानुसार Form 31 कलम 68 J च्या अंतर्गत आंशिक रक्कम काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.

घर बांधणी, मालमत्ता खरेदी, लग्न आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या विविध कारणांसाठी Form 31 चा वापर केला जातो. यापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी फक्त 50,000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येत होती, आता मात्र तुम्ही 1,00,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या गोष्टी महत्वाच्या:

PF खात्यातून रक्कम काढताना गेल्या सहा महिन्यांचा तुमचा भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता आणि व्याज यावर तुम्ही दावा करू शकत नाही. मात्र तुमच्या खात्यात 1,00,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम शिल्लक असेल तरच तुम्ही ती रक्कम काढू शकता(EPF Withdrawal Limit).

EPFOने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम फक्त जीवनावश्यक आजारांसाठी वापरता येते आणि केवळ सरकारी रुग्णालयात किंवा सरकारशी संलग्न असलेल्या रुग्णालयात दाखल असलेले कर्मचारी किंवा त्यांच्या पती/पत्नीसाठीच ही रक्कम काढणे शक्य आहे. जर रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असेल तर दावा मान्य करण्यापूर्वी त्यांची समीक्षा केली जाईल.

Leave a Comment