Elon Musk Visit: एलॉन मस्क भारतात येणार; मोदींना भेटण्याची उत्सुकता “का?”

Elon Musk Visit: एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे CEO आहेत. कितीतरी दिवसांपासून मस्क भारतात येणार अश्या चर्चा सुरु होत्या आणि आता लवकरच मस्क भारताला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या दवर्यात मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची भेटीची शक्यता आहे, दरम्यान अशीही अपेक्षा आहे की मस्क भारतात टेस्ला इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन करण्याच्या योजनेची घोषणा करतील.

सरकारसाठी फायद्याचे:(Elon Musk Visit)

एलॉन मस्क यांची भारत यात्रा ही निश्चितच सरकारसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणारी ठरेल. कशी? तर, जगभरातील एका मोठ्या परदेशी कंपनीने भारतात कारखाना उभारणे हे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करेल. केंद्र सरकारने टेस्लाला नोंदणीकृत आणि उत्पादन कंपनी म्हणून मान्यता देण्याची योजना आखली आहे अशी माहिती मिळते.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतात 2-3 अब्ज डॉलर गुंतवणूक करून कारखाना उभारण्याची योजना आखत आहे(Elon Musk Visit). या कारखान्यात कंपनी सामान्य लोकांसाठी 25 लाख रुपयांच्या आसपास किंमतीची किफायतशीर इलेक्ट्रिक गाडी बनवण्याचा विचार करत असून टेस्लाची योजना दरवर्षी 5 लाख गाड्या बनवण्याची आहे.

या परिश्रमांमधून टेस्लाला यश मिळेल की नाही हे निश्चितपणे सांगणे मात्र अद्याप कठीण आहे, कारण भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात सुरु असलेली पाहायला मिळते. चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि वाहनांच्या उच्च किंमती यांसारख्या अनेक आव्हानांना आपण तोंड देत असल्याने या संधर्भात ठोस वक्तव्य केले जाऊ शकत नाही.

Leave a Comment