Elon Musk Visit: मस्क यांचा भारत दौरा अचानक रद्द; नेमकं कारण काय?

Elon Musk Visit: टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचं भारतात येण्याचं नियोजन आत्तासाठी स्थगित करण्यात आलं असून यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही 23 एप्रिल रोजी अमेरिकेत होणाऱ्या टेस्लाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांबाबतच्या कॉन्फरन्स कॉलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जातंय.

इलॉन मस्क भारतात येणार नाही: (Elon Musk Visit)

गेल्या अनेक दिवसांपासून टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क भारतात येणार अश्या बातम्या फिरत होत्या, मात्र आज त्यांनी हा दौरा रद्द झाल्याची बातमी स्वतः X प्लॅटफॉर्मवर दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार देखील टेस्लाचे मालक इलॉन मस्क सध्या भारतात येणार नाहीत आणि 23 एप्रिल रोजी टेस्लाच्या तिमाही निकालांची माहिती देण्यासाठी हा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

खरंतर इलॉन मस्क सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते आणि टेस्लाच्या भारतातील व्यवसायाबद्दल घोषणा करणार होते, परंतु हा बेत आता रद्द करण्यात आला आहे. 10 एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वतः X वर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली होती. टेस्लाचं भारतात मोठी गुंतवणूक करण्याचं नियोजन देखील होतं, याच कारखान्याच्या उभारणी बाबत आणि भारतात मोठी गुंतवणूक करण्याच्या शक्यतांबाबत चर्चा करण्यासाठी इलॉन मस्क भारतात येणार होते.

दौरा 48 तासांचा होता:

इलॉन मस्क यांचा भारतात एकूण 48 तासांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता, ज्यामध्ये इलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होत आणि त्यानंतर ते अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि उद्योगपतींची भेट घेणार होते(Elon Musk Visit). परंतु, आता हा दौरा पुढे ढकलल्यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे बदलणार आहे.

Leave a Comment