Elon Musk India Visit: भारतात येणारं मस्कचं विमान चीनला का वळलं?

Elon Musk India Visit: टेस्लाचे CEO एलोन मस्क यांनी नुकताच चीनचा आकस्मित दौरा केला आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचा दौरा पुढे ढकलला होता. पाहायला गेलं तर भारत आणि चीन यांचे संबंध फारसे चांगले नाहीत, मग भारत सोडून मस्क चीनला का चाललेत असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे, म्हणूनच आज आपण मस्क यांच्या चीन दौऱ्यामागील कारणांचा आढावा घेणार आहोत.

टेस्लासाठी चीन महत्वाचा: (Elon Musk India Visit)

चीन ही टेस्लासाठी अमेरिकेनंतर दुसरा सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या दहा वर्षांत चीनमध्ये 17 लाखांहून अधिक गाड्या विकल्या गेल्या आहेत त्यामुळे टेस्लाच्या जागतिक कारभारात चीन हा देश अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. मस्कचा चीन दौरा हा टेस्लाच्या पूर्ण स्वायत्त ड्राइव्हिंग (FSD) सॉफ्टवेअरला मान्यता मिळवण्यासाठी प्रामुख्याने आखण्यात आला आहे. टेस्लाच्या स्वायत्त ड्राइव्हिंग तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा भाग असलेल्या FSD सॉफ्टवेअरला अजून चीनमध्ये लाँच करण्यात आलेले नाही, कारण चीनच्या बाजारपेठेत स्वायत्त ड्राइव्हिंग क्षमता विस्तारण्यासाठी FSD ला नियामक मान्यता मिळणे आवश्यक आहे.

डेटा ट्रान्सफरचा अडथळा:

मस्कच्या या दौऱ्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डेटा ट्रान्सफर नियमांशी संबंधित आहे. टेस्ला सध्या चीनमध्ये चालणाऱ्या त्यांच्या गाड्यांकडून डेटा गोळा करतेय, पण हा डेटा परदेशात पाठवण्यावर बंधने आहेत(Elon Musk India Visit). डेटा ट्रान्सफर करण्याची परवानगी मिळाल्यास टेस्ला त्यांचे स्वायत्त ड्राइव्हिंग तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी या मौल्यवान माहितीचा वापर करू शकते.

Leave a Comment