Electoral Bonds: SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) निवडणूक रोख्यांच्या तपशीलांची माहिती देण्यास नकार दिला आहे. RTI कार्यकर्ता लोकेश बत्रा यांनी सदर माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI) ही माहिती मागितली होती. सदर RTI अंतर्गत बत्रा यांना SBI कडून निवडणूक रोखे खरेदीदारांची आणि राजकीय पक्षांची नावे यासह संबंधित माहितीची अपेक्षा होती, मात्र त्यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे.
SBI ने माहिती देण्यास दिलाय नकार: (Electoral Bonds)
बत्रा यांनी 13 मार्च रोजी SBI ला निवडणूक रोखे खरेदीदारांची आणि राजकीय पक्षांची नावे यासह संबंधित माहितीची मागणी केली होती, मात्र बँकेने अधिकृत विनंत्याने माहिती देण्यास नकार दिला आणि सोबत RTI कायद्याच्या कलम 8(1) (E) आणि 8(1) (J) ह्या दोन कलमांचा हवाला दिला. पहिल्या कलम रेकॉर्डशी संबंधित आहे, तर दुसरी कलम वैयक्तिक माहिती प्रदान करण्याचा संदर्भ देते.
“आपण विनंती केलेली माहिती खरेदीदारांच्या आणि राजकीय पक्षांचा तपशील आहे आणि त्यामुळे ही माहिती प्रकट केली जाऊ शकत नाही.” असे उत्तर बत्रांना देण्यात आले होते. तसेच बँकेने भरलेला शुल्काचा तपशील हा वैयक्तिक स्वरूपातील माहिती अंतर्गत येत असल्याने याबद्दल देखील बत्रांना नकारच मिळाला होता.
घडलेल्या प्रकाराबद्दल बत्रा आश्चर्य व्यक्त करतात कारण SBI ने जी माहिती प्रदान करण्यास नकार दिला आहे, ती सर्व माहिती ECIच्या वेबसाइटवरच आधीच उपलब्ध आहे (Electoral Bonds). 14 मार्च रोजी ECI ने त्यांच्या वेबसाइटवर SBI ने सबमिट केलेले डेटा प्रकट केला होता.