Election Holiday: मतदानानिमित्त 20 मे रोजी शेअर बाजार बंद
Share Market and Election: देशात बऱ्यापैकी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच आज आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशात होणाऱ्या निवडणुकांपैकी 20 मे रोजी मुंबई निवडणुकांमुळे दोन्ही शेअर बाजार बंद राहतील. परिणामी या दिवशी शेअर, डेरिव्हेटिव्ह, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग श्रेणीमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
शेअर बाजार बंद: (Election Holiday)
मुंबई निवडणुकांमुळे शेअर बाजार 20 मे रोजी बंद असेल. मात्र याशिवाय ईद-उल-फित्र (ईद) निमित्त 11 एप्रिल, राम नवमीच्या निमित्ताने 17 एप्रिल आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद ठेवला जाणार आहे, याची नोंद घेतली पाहिजे.
महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अश्या पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे(Election Holiday). पैकी 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि पालघर या जागी मतदान होईल.