Byju’s Update: कष्टानंतर दिसला आशेचा किरण; Byju’s साठी आनंदवार्ता

Byju’s Update: गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात उत्तम नाव कमावलेली कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या Byju’s ची चांगलीच चर्चा सुरु आहे, पण ही चर्चा त्यांनी कमावलेल्या यशाची नाही तर आर्थिक अडचणींची आहे. कंपनी आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी चहू बाजूंनी प्रयत्न करतेय, हेच या चर्चेचं खरं कारण. कालच तुम्ही देखील कंपनीच्या CEO नी कंपनीला राम-राम ठोकल्याची बातमी वाचलीच असेल, मात्र या सर्वउलट आजची ही बातमी कंपनीला दिलासा देणारी ठरते.

कंपनीची स्थिती सुधारली: (Byju’s Update)

Byju’sची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांची एकमेक पाठोपाठ राजीनामे द्यायला सुरुवात केली आणि कंपनीवर देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची वेळ आली. इतकंच नाही तर काही शहरांमधील कार्यालयेही रिकामी करावी लागली होती. या कंपनीची किंमत फक्त एका वर्षात 99 टक्क्यांनी घसरली मात्र, या सर्व संकटांच्या वातावरणात आता बायजून्ससाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

200 दशलक्ष डॉलर राईट्स इश्यूला मंजूरी:

PTIच्या वृत्तानुसार, Byju’sची मूळ कंपनी असलेल्या ‘Think and Learn’ च्या बहुतांश भागधारकांनी कंपनीची अधिकृत शेअर पूंजी वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. Byju’s ने राईट्स इश्यूद्वारे 200 दशलक्ष डॉलर उभारले होते आणि आता भागधारकांकडून त्याला मंजुरीने मिळाली आहे(Byju’s Update). कंपनीच्या निवेदनानुसार, या EGM च्या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्यामुळे Byju’sची मूळ कंपनी Think and Learn Pvt. Ltd ला नवीन शेअर्स जारी करण्यास आणि आर्थिक नुकसानीवर मात करण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Comment