Byjus India CEO Quits: केवळ 7 महिन्यांतच CEOने ठोकला रामराम!! आता कंपनीचे काय?

Byjus India CEO Quits: Byju’s ही कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे कंपनीजवळ कर्मचाऱ्यांचा पगार देखील देण्याएवढे पैसे बाकी नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. एवढंच नाही तर सुरूवातीला ऑफिस बंद होण्याची समस्या, नंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कमी ह्यांच्या बाबतीत काहीतरी चर्चा रंगल्या, आणि आता बायजू कंपनीच्या CEO ने केवळ वर्षभरातच कंपनीला राम राम ठोकला आहे.

काही महिन्यांतच राजीनामा का? (Byjus India CEO Quits)

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करीत असलेल्या बायजू कंपनीला आज आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे CEO अर्जुन मोहन यांनी फक्त सात महिन्यांच बायजू कंपनीशी पाठ फिरवल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. कंपनीला मिळालेल्या माहितीनुसार बायजूचे CEO अर्जुन मोहन यांच्या राजीनाम्यानंतर आता कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन कंपनीच्या प्रशासनिक कामांची जबाबदारी उचलतील.

CEO अर्जुन मोहन यांचा राजीनामा कंपनीच्या दृष्टीने आणखी एक मोठा धोका मानला जातोय, मात्र यात एकमेव आनंदाची बाब ठरेल ती म्हणजे राजीनाम्यानंतर देखील अर्जुन मोहन सल्लागार म्हणून कंपनीसोबत कायम राहतील. वरती नमूद केल्याप्रमाणे कंपनीवर सध्या आर्थिक संकटांचं ओझं कायम आहे, काही गुंतवणूकदार कंपनीच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि अश्यातच आता कंपनीच्या CEOनी पदावरून उतरत आणखीन एक मोठा धक्का दिलाय.

काय म्हणतात रवींद्रन?

आत्ताची परिस्थिती कंपनी आणि कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यासाठी तारेवरची कसरतच म्हणावी लगेल(Byjus India CEO Quits), मात्र तरीही बायजू रवींद्रन हार मानायला तयार नाहीत. ते म्हणतात की अश्या कठीण काळातूनच मार्ग काढत कंपनी एक नवीन स्वरूप सर्वांसमोर आणेल. ही नवीन सुरूवात करवण्यासाठी आता पुन्हा एकदा बायजू रवींद्रन यांनाच कंबर कसावी लागेल एवढं मात्र नक्की.

Leave a Comment