Byju Course Fee Cut: Byju’s चा धक्कादायक बदल; अचानक केला अभ्यासक्रम स्वस्त

Byju Course Fee Cut: भारतातील सर्वात मोठ्या EdTech कंपन्यांपैकी एक असलेली बजाजू कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी धोरणात्मक बदल करत आहे. समोर आलेल्या वित्तीय अडचणी आणि कायदेशीर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, त्यांनी अभ्यासक्रमांच्या शुल्कात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजू कंपनीकडून ग्राहकांना सूट: (Byju Course Fee Cut)

बायजूचे संस्थापक आणि CEO बायजू रवींद्रन यांनी कंपनीच्या नव्या धोरणाची माहिती देण्यासाठी 1500 विक्री कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनी वाचविणे आणि वाढवण्याचे महत्व अधोरेखित केले, तसेच अधिक लवचिक अभ्यासक्रम बनवण्यावर भर दिला. शुल्क कपातीमुळे Byju Learning ची वार्षिक सदस्यता आता फक्त 12,000 असेल. Byju Classes आणि Byju Tution Center (BTC) ची एक वर्षाचे पूर्ण शुल्क आता अनुक्रमे 24,000 आणि 36,000 असेल. याचाच अर्थ आता सर्व अभ्यासक्रमांच्या शुल्कात 30 ते 40 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे(Byju Course Fee Cut).

1 thought on “Byju Course Fee Cut: Byju’s चा धक्कादायक बदल; अचानक केला अभ्यासक्रम स्वस्त”

  1. Byju’s चा अभ्यासक्रम कोणीही चुकूनही घेऊ नका, मोठे मोठे दावे केले होते अभ्यासक्रम घेताना, मुलांना वैयक्तिक कॉल येतील, प्रश्न सोडवले जातील, पण जी कंपनी स्वतः खड्ड्यात आहॆ, ती कंपनी दुसऱ्याला काय मदत करणार, सहावी लाच मुलगी असताना त्यांना सांगितले की भरलेले पैसे रिटर्न देऊन टाका,तर त्यांनी उत्तर दिले की 3वर्षाचा अभ्यासक्रम आहॆ हा, पैसे रिटर्न देऊ शकत नाही, सेल्स पर्सन ने सांगितले होते, तुम्हाला नाही आवडले तर पैसे परत करू, चुकूनही मेम्बरशिप घेऊ नका, वेळ वाया नका घालू

    उत्तर

Leave a Comment