News,Trending

Bhavesh Gupta Resignation: Paytm कंपनीला धक्का; COO आणि अध्यक्षांनी ठोकला रामराम

Bhavesh Gupta Resignation: डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी Paytmला आज एक मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे Chief Operating Officer आणि अध्यक्ष भवेश गुप्ता यांनी 4 मे रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली. नियमावली दाखल्यानुसार, गुप्ता यांनी 31 मे रोजी कार्यालयीन वेळ संपायच्या अगोदरच राजीनामा देणार असल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे. मात्र, हा राजीनामा दिल्यानंतरही सल्लागदार म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत काम करत कंपनीला पाठिंबा देण्याचा त्यांचा मनोदय आहे.

गुप्ता का सोडतायत कंपनी? (Bhavesh Gupta Resignation)

गुप्ता यांनी वैयक्तिक कारणांमुळे करियर ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. भावेश गुप्ता यांच्या निणर्यानंतर त्यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारला असून 31 मे 2024 रोजी कार्यालयीन वेळ संपताच्या आधी त्यांची सेवा संपणार आहे.

गुप्तांच्या राजीनाम्यावर बोलताना पेटीएमचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा म्हणाले, “मी भवेश यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या सुलभ भूमिकेबद्दल आभार व्यक्त करतो. सध्या कंपनीचा पेमेंट आणि कर्ज देण्यावर भर अधिक मजबूत झाला असून येणाऱ्या काळात मी प्रत्येक व्यवसायात अनुभवी नेत्यांसोबत योजना राबवण्यासाठी काम करेन(Bhavesh Gupta Resignation). तसेच आम्ही तरुण भारतीय लोकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर संपत्ती व्यवस्थापन सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत असंही ते म्हणाले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button