Bharti Airtel Q4 Results: भारती एरटेलच्या निकालांबद्दल काय म्हणतात विश्लेषक?

Bharti Airtel Q4 Results: जसं की तुम्ही पाहिलंच असेल अनेक कंपन्या सध्या चौथा तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि काही विश्लेषक त्यांच्या तोट्यावर आणि नफ्यावर चर्चा करीत आहेत. आपल्या देशातील अशीच एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी म्हणजेच भारती एरटेल. भारती एयरटेलची मार्च तिमाही (Q4) च्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या विक्रीमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता असली तरी, नफ्यात 10 टक्क्यांहून अधिक घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कसा असेल भारतीचा तिमाही निकाल? (Bharti Airtel Q4 Results)

विश्लेषकांच्या मते, भारती एयरटेलला या तिमाहीत 30 लाख नवीन ग्राहक मिळू शकतात. तसेच, सरासरी प्रति ग्राहक महसूलात (ARPU) 211 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. उद्योग आणि घरगुती सेवा क्षेत्रात स्थिर वाढ दिसून येण्याचा अंदाज असला तरीही थेट प्रसारण सेवा (DTH) क्षेत्रातील वाढ मंदावण्याची शक्यता आहे. या तिमाहीत 5G चा वापर, भांडवल खर्च (capex), Pre-Paid, Post-Paid ग्राहकांचे रूपांतर, ब्रॉडबँड क्षेत्रातील वाढ आणि कंपनीच्या Partly Paid Rights Issue वरील माहितीकडे सर्वांचे लक्ष असेल. Emkay Global या ब्रोकरेज फर्मने भारती एयरटेलचा ARPU 1.4 टक्क्यांनी वाढून 211 रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या तिमाहीत थोडे कमी दिवस असल्यामुळे ग्राहकसंख्येतील वाढ कमी झाली आहे तरीही ARPU वाढण्यामुळे एकूणच कंपनीची महसूल वाढ होण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते (Bharti Airtel Q4 Results). भारतातील मोबाइल क्षेत्रातील महसूल 1.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. होम सर्व्हिसमध्ये सतत ग्राहक वाढ होत असल्यामुळे तिमाही-दर-तिमाही आधारित 3.9 टक्के आणि वर्षभराच्या तुलनेत 20.5 टक्के वाढ होण्याचा अंदाज लावला जातोय, तरीही Enterprise Segment मध्ये फारशी वाढ दिसून येणार नाही असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment