Best Saving Plan: आजच्या जगात महागाई प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि अश्यात आपल्या कमाईमधून काही रक्कम वाचवून गुंतवणूक करण्याचा विचार प्रत्येकालाच करावा लागतो. अशी गुंतवणूक जिथे आपले पैसे सुरक्षित राहतातच पण यासोबतच चांगला परतावाही मिळतो. अशा अनेक गुंतवणूक योजना असल्या तरीही त्यामध्ये सरकारची एक योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निधी (Public Provident Fund) बद्दल.
जास्त व्याज आणि कर सूट: (Best Saving Plan)
सार्वजनिक भविष्य निधीमध्ये गुंतवणूक केल्यावर केवळ उत्कृष्ट व्याज दिले जात नाही तर तुमच्या गुंतवणूची सुरक्षाही सरकार स्वतः करते. PPF व्याज दराबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये गुंतवणूक करण्यावर तब्बल 7.1 टक्के व्याज दिला जातो. यासोबतच, पोस्ट ऑफिस योजनेमध्ये कर सूट देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, चांगल्या परताव्यासोबतच बचतीच्या दृष्टीनेही ही योजना फायदेशीर ठरते. PPF योजनेत दरवर्षी केली जाणारी गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त राहते. याशिवाय, गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या व्याजावर आणि परिपक्व रकमेवरही कोणताही कर भरावा लागत नाही.
फक्त 250 मध्ये गुंतवणूक:
जर तुम्ही दररोज या योजनेत 250 जमा करत असाल तर तुमची मासिक बचत 7500 होते आणि वार्षिक आधारावर तुम्ही 90,000 जमा कराल(Best Saving Plan). ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 15 वर्षे PPF मध्ये गुंतवणूक करावी लागेल, म्हणजेच, 15 वर्षांत, दरवर्षी 90,000 च्या दराने तुमची एकूण जमा रक्कम 13,50,000 होईल आणि त्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळाले तर एकूण रक्कम 10,90,926 होईल आणि परिपक्वतेवर तुम्हाला एकूण 24,40,926 रक्कम मिळेल.