Banking Sector: देशात बँकिंग क्षेत्राचा विक्रम; मोदींनी ट्विट करून केले कौतुक

Banking Sector: देशात सध्या निवडणुकांचे वातावरण असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत गेल्या 10 वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात झालेल्या बदलांचा उल्लेख केला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने पहिल्यांदाच 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सूचीबद्ध बँकांचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून 3.1 लाख कोटी रुपये इतका झाला आहे.

देशात बँकांची दमदार कामगिरी: (Banking Sector)

समोर आलेल्या माहितीनुसार खाजगी क्षेत्रातील बँकांनी 1.4 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 1.7 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बँकांच्या या दमदार कामगिरीवर खुश होत देशीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग क्षेत्रातील विक्रमी नफ्याबद्दल ट्वीट करत म्हटले की, “गेल्या 10 वर्षांत भारताच्या बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले आहेत. NDA सरकार सत्तेत येण्यापूर्वी भारतीय बँकांवर मोठ्या प्रमाणात NPA चे ओझे होते. UPA सरकारच्या फोन-बँकिंग धोरणामुळे भारतातील बँका मोठ्या प्रमाणात तोट्यात आणि अधिक NPA च्या जाळयात अडकत होत्या आणि गरीबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते.”

ते पुढे म्हणाले की भारतीय बँकांच्या परिस्थितीत झालेली ही सुधारणा गरीब, शेतकरी आणि MSME ला सहज कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करेल. इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आता खाजगी क्षेत्रातील बँकांसोबत सुधारली आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा वाढला आहे(Banking Sector). बँकिंग क्षेत्रात वाढलेले हे आकडे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहेत, यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल आणि गरीब तसेच शेतकरी लोकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा मिळतील.

Leave a Comment