Bank Holidays In May: नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना एप्रिल संपत आला असून मे 2024 जवळ आला आहे. यापुढील महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेली बँक सुट्ट्यांची यादी जरूर पाहा कारण, मे महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
अश्या असतील मे महिन्यातील सुट्ट्या:
बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार तुमच्या बँकेशी संबंधित कामांचं नियोजन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रिझर्व्ह बँक दर महिन्याच्या सुरुवातीला येत्या महिन्यातील बँक सुट्ट्यांची आणि त्यांची कारणं यांची यादी वेबसाइटवर अपलोड करते. त्यानुसार मे 2024 च्या बँक सुट्ट्यांची यादीही अपलोड करण्यात आली आहे. मे महिन्यात येणाऱ्या या सुट्ट्यांमध्ये अक्षय तृतीया, महाराष्ट्र दिन, रवींद्रनाथ टागोर जयंती आणि इतर सुट्ट्यांचा समावेश आहे.
मात्र तुमच्या शहरानुसार बँकांच्या सुट्या बदलू शकतात, त्यामुळे तुमच्या सवडीनुसार ही यादी तपासून घ्या. बाकी रोख रक्कम काढण्यासाठी तुम्ही बँक सुट्ट्यांच्या दिवशी ATM चा वापर करू शकता. तसेच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगचा वापर करू शकता(Bank Holidays In May). लक्षात घ्या की नेट बँकिंगची सुविधा 24 तास, 7 दिवस चालू असते.
बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहा:(Bank Holidays In May)
1 मे 2024 (महाराष्ट्र दिन, कामगार दिन) | बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई आणि नागपूर |
5 मे 2024 (रविवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |
7 मे 2024 (लोकसभा निवडणूक) | अहमदाबाद, भोपाळ, पणजी आणि रायपूर |
8 मे 2024 (रवींद्रनाथ टागोर जयंती) | कलकत्ता |
10 मे 2024 (अक्षय तृतीया) | बेंगळुरू |
11 मे 2024 (दुसरा शनिवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |
12 मे 2024 (रविवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |
13 मे 2024 ( लोकसभा निवडणूक) | श्रीनगर |
16 मे 2024 (स्टेट डे) | गंगटोक |
19 मे 2024 (रविवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |
20 मे 2024 (लोकसभा निवडणूक) | बेलापूर, मुंबई |
23 मे 2024 (बुद्ध पौर्णिमा) | आगरतळा, ऐझॉल, बेलारपूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, इटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर |
25 मे 2024 (चौथा शनिवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |
26 मे 2024 (रविवार) | सर्व ठिकाणी सुट्टी |