Bank Holiday: आजच्या दिवशी बँका खुल्या राहणार; शनिवारी सुट्टी का नाही?

Bank Holiday: सर्वोच्य बँकेच्या नियमांनुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे, मात्र आज शनिवार दिनांक 18 मे रोजी बँका खुल्या असतील आणि म्हणून तुम्हाला निराशा होण्याची गरज नाही. मे महिन्यातील हा शनिवार तिसरा शनिवार असल्याने आज सर्व बँकांमधील अधिकृत कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत चालणार आहे.

मे महिन्यात एवढे दिवस बँका बंद: (Bank Holiday)

रविवारशिवाय, दर महिन्याच्या दुसरा आणि चौथा शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वर्गीकृत केलेल्या सुट्ट्यांच्यानुसार बँका बंद असतात. या सुट्ट्यांमध्ये Negotiable Instruments Act Holiday, Real Time Gross Settlement Holiday आणि Bank Account Closures सारख्या सुट्ट्यांचा समावेश होतो. सर्वोच्य बँकेच्या कॅलेंडरानुसार, मे महिन्याच्या उर्वरित दिवसांमधील बँक सुट्ट्यांची माहिती पुढीलप्रमाणे:

  • 20 मे रोजी बँक सुट्टी: महाराष्ट्रातील सर्व बँका 20 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्तानं बंद राहतील.
  • 23 मे रोजी बँक सुट्टी: त्रिपुरा, मिझोरम, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक प्रदेशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँका बंद राहतील.
  • 25 मे रोजी बँक सुट्टी: अगरतळा आणि भुवनेश्वर या भागांमधील बँका बंद राहतील.

वर नमूद केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक (PNB), भारतीय स्टेट बँक (SBI), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), ICICI Bank, HDFC Bank इत्यादी राष्ट्रीय सुट्यांच्या आधारे स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती आणि ख्रिसमससारख्या दिवशी बंद ठेवल्या जातात(Bank Holiday). बँकांकडून सध्या पाच दिवसीय आठवडा लागू करण्याच्या मागणी सुरु आहे, यावर विचार सुरु असला तरीही बँकांसाठी पाच दिवसीय आठवडा लागू करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Leave a Comment