Bank Holiday Today: आज देशभरातील 10 राज्यांच्या 96 जिल्ह्यांमध्ये लोकसभेतील निवडणूकाच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे आणि म्हणूनच या भागांतील काही बँकांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा जर का मतदान सुरु असलेल्या भागांमध्ये राहत असाल तर बँका बंद असल्याने तुमची महत्वाची कामं अडकून पडण्याची शक्यता आहे. चला तर मग मतदानाच्या निमित्ताने देशातील कोणत्या ठिकाणी बँकांचे व्यवहार बंद आहेत हे तपासून पाहुयात.
या ठिकाणी बँका बंद: (Bank Holiday Today)
आज, तेलंगणामधील 17, आंध्रप्रदेशातील 25, उत्तर प्रदेशातील 13, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, आणि पश्चिम बंगालमधील 8 तर जम्मू काश्मीरच्या एका सीटसाठी लोकसभेचे मतदान सुरु आहे. मतदानाच्या कारणामुळे आज तेलंगणासह बाकी सर्व राज्यांमधील बँकांचे व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात देखील आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे आणि याच्याच परिणामी महाराष्ट्रातील लोकांना आज बँकांची कामे करता येणार नाहीत(Bank Holiday Today). मात्र तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगत झालेलो असल्याने मतदानाच्या कारणामुळे आपले आर्थिक व्यवहार ठप्प होणार नाहीत. बँका बंद असताना देखील तुम्ही ATM, NET Banking, Mobile Banking यांसारख्या पर्यायांचा वापर करू शकता. मतदान हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार असल्याने आजचा दिवस महत्वाचा ठरतो, आणि म्हणूनच आपली महत्वाची कामं काही काळासाठी का होईना आपण बाजूला ठेऊन मतदान केलंच पाहिजे.