Anil Ambani: अनिल अंबानींची कंपनी स्वीकारणारा “हा” मालक कोण?

Anil Ambani: रिलायंस कॅपिटल जी कुणाएकेकाळी अनिल अंबानींच्या वाढत्या साम्राज्याचा कणा होती ती आता हिंदूजा गटाच्या नियंत्रणाखाली जात आहे. 9,650 कोटीच्या कराराने, IIHL (हिंदूजा समूहाची उपकंपनी) द्वारे रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले जाणार आहे आणि हे अधिग्रहण भारतीय आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.

रिलायन्सचे अधिग्रहण: (Anil Ambani)

कधीकाळी भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक सेवा कंपन्यांपैकी एक असलेली रिलायंस कॅपिटल, कर्जामुळे त्रस्त झाली आणि 2020 मध्ये दिवसळखोरीच्या प्रक्रियेत अडकली. अनेक लोकांसोबत बोली लावल्यानंतर, IIHL कडून लावण्यात आलेली बोली विजयी ठरली ज्यामुळे हिंदूजा गटाला वित्तीय सेवा क्षेत्रात प्रवेश मिळाला.

रिलायंस कॅपिटलसाठी, हे अधिग्रहण नवीन सुरुवातीची शक्यता दर्शवते. हिंदूजा गटाची आर्थिक ताकद आणि अनुभव कंपनीला कर्ज कमी करण्यास आणि पुन्हा भरारी घेण्यात मदत करू शकते. दुसरीकडे, हिंदूजा गटाला वित्तीय सेवा क्षेत्रात त्यांची उपस्थिती मजबूत करण्याची आणि भारतीय बाजारपेठेतील त्यांचा वाटा वाढवण्याची संधी मिळणार आहे.

कोण आहे हिंदुजा ग्रुप?

हिंदूजा समूह, 1940 च्या दशकात स्थापन झाला होता. जगभरातील अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारा एक बहुराष्ट्रीय समूह आहे(Anil Ambani). समूहाचे नेतृत्व आशोक पी हिंदूजा करतात, ज्यांना त्यांच्या व्यावसायिक कुशलतेसाठी आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जाते.

Leave a Comment