Anil Ambani: अनिल अंबानींच्या हातून कंपनी निसटली; हिंदुजा Reliance Capital चे नवीन मालक

Anil Ambani: काल भारतीय आर्थिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण घटना घडली. हिंदुजा ग्रुपच्या IndusInd International Holdings limited (IIHL) ला Reliance Capital ही अनिल अंबानींची कंपनी विकत घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडून मिळाली आहे. परिणामी आता कंपनीचे जुने मालक अनिल अंबानी यांची ही कंपनी हिंदुजा ग्रुपच्या ताब्यात जाणार आहे. आर्थिक अडचणींशी झुंजार देत असलेल्या Reliance Capital च्या दिवाळखोर घडामोडींमध्ये काल एक मोठा टप्पा पार पडला आहे.

हिंदुजा कंपनीचा ‘Master Plan’: (Anil Ambani)

IRDAI ची ही परवानगी काही कायदेशीर आणि न्यायालयीन अटींच्या अधीन असली तरीही, या परवानगीमुळे अधिग्रहणातील एक मोठी अडचण दूर झाली आहे. हिंदुजा गेल्या अनेक दिवसांपासून या परवानगीची वाट पाहत होता. Reliance Capital चा विमा व्यवसाय या अधिग्रहणाचा मुख्य मुद्दा आहे. यामध्ये पूर्णपणे मालकी असलेली Reliance General Insurance आणि संयुक्त उपक्रम असलेली Reliance Nippon Life Insurance यांचा समावेश होतो.

नोव्हेंबर 2021 मध्ये Reliance Capital च्या व्यवस्थापनाबाबतच्या चिंता आणि थकबाक्यांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कंपनीचा ताबा स्वीकारला होत आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या अधिग्रहणासाठी बोली लावायला सुरुवात झाली. पुढे जून महिन्यात हिंदुजा ग्रुपने लावलेली बोली सर्वांच्या पसंतीस पडली. हिंदुजा समूहाने 9,661 कोटी आणि थकित रकमेसाठी अतिरिक्त 500 कोटींची रक्कम देऊ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि या करारावर आधीच त्यांना बँकिंग, भांडवल बाजार नियामक आणि स्पर्धा आयोग (CCI) यांची मान्यता मिळाली होती.

फेब्रुवारी 2024 मध्ये हिंदुजा ग्रुपला NCLT ची मान्यता मिळाली, ज्यामुळे अधिग्रहणाचा मार्ग अधिक सोपा झाला आणि आता शेवटी या कराराला IRDAI ची परवानगी मिळाल्यामुळे लवकरच अनिल अंबानींची (Anil Ambani) कंपनी हिंदुजाच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment