Amit Shah: “4 जूनच्या अगोदर करा गुंतवणूक” बाजाराच्या घसरणीवर काय म्हणले अमित शाह?

Amit Shah: आजच्या दिवशी, बाजार सुरू होताच शेअर्समध्ये बऱ्यापैकी घसरण व्हायला सुरुवात झाली होती. Sensex 700 अंकांनी तर Nifty 200 अंकांनी घसरला होता. सध्या बाजारात होणाऱ्या या सततच्या घसरणीवर अनेकांनी मतं मांडायला सुरुवात केली आहे आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचे मत स्पष्ट केले. बाजाराची घसरण हा एक महत्वाचा विषय असल्याने गृह मंत्री नेमकं काय म्हणतायत हे जाणून घेऊया.

काय म्हणले अमित शहा? (Amit Shah)

एका मुलाखतीत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाजारातील सुधारणेवर चर्चा केली, त्याच्या मतानुसार भारतीय बाजारात जून 2024 नंतर सुधारणा दिसून येईल. आज देशात चौथ्या टप्प्याच्या निवडणूक पार पडल्या आणि यानंतर चार तारखेला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. देशात सुरु असलेल्या निवडणुकांना बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण मानलं जातंय आणि अश्यात अश्या अफवांवर भर देत विश्वास ठेवला जाऊ नये अशी माहिती अमित शहा यांनी आज माध्यमांना दिली, त्यांच्या मते निवडणूका आणि बाजार त्यांचा काहीही संबंध नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात घसरण होण्याची ही पहिली वेळ नाही, आणि आपण जर का अश्याच अफवांना खतपाणी देत राहिलो तर येणाऱ्या काळात बाजार चढणार नाही आणि म्हणूनच निकालांच्या आधी बाजारात गुंतवणूक सुरु करा कारण येणारा काळ हा बाजारासाठी नक्कीच सुखाचा असेल(Amit Shah). बाजारातील अनेक तज्ज्ञांच्या मते भारतीय जनता पक्षाचा जर का बहुमताने विजय झाला तर शेअर बाजार वाढेल, मात्र निकालांमध्ये जराही फेर बदल झाल्यास बाजारवारही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.

Leave a Comment