Akshaya Tritriya: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीचा “हा” सोयीस्कर पर्याय

Akshaya Tritriya: आपल्याकडे दिवाळी दसऱ्याप्रमाणे अक्षय तृतीया हा दिवस देखील सोन्याच्या खरेदीसाठीचा शुभमुहूर्त मानला जातो. मात्र, सध्या सोन्याच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर सध्या सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण जर का अक्षय तृतीयेचा हा दिवस तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करूनच पूर्ण करायचं असेल तर अश्या महागाईत देखील तुम्ही केवळ 1 रुपयांत 24 कॅरेट सोनं खरेदी करू शकता. आश्चर्य वाटलं ना? कसं हे जाणून घ्या…

डिजिटल सोन्याची खरेदी: (Akshaya Tritriya)

तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या जगात डिजिटल स्वरूपात सोनं खरेदी करण्याची सोयीस्कर आणि परवडणारी एक नवीन पद्धत बाजारात आली आहे. महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला सोन्याच्या दुकानांमध्ये जाण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही घरात बसून डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करू शकता. विशेष म्हणजे,इथे फक्त 1 रुपयात सोनं खरेदी करण्याची सोया उपलब्ध आहे.

डिजिटल सोनं म्हणजे काय?

डिजिटल सोनं हे त्याच्या भौतिक स्वरूपाऐवजी डिजिटल स्वरूपात असलेले सोने आहे. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हे सोनं खरेदी करता आणि तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा करता. हे सोनं बाजारात सराफाच्या किमतीनुसार खरेदी केलं जातं आणि नंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते विकू शकता आणि विक्री केल्यावर मिळणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते.

MMTC-PAMP India Pvt., Augmont Gold Ltd.सारख्या कंपन्या डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा देतात. शिवाय, Google Pay आणि PhonePe सारख्या लोकप्रिय apps द्वारे देखील तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता.

सोनं खरेदी करताना काळजी घ्या:

डिजिटल सोनं हा सोनं खरेदी करण्याचा सोयीस्कर पर्याय असला तरी सोनं खरेदी करताना काही बाबी लक्षात ठेवाव्यात (Akshaya Tritriya). आपण खरेदी करत असलेल्या सोन्यावर hallmarking आहे की नाही याची खात्री करा. BIS Care App वर येणारा HUID नंबर टाकल्यास तुम्ही त्या सोन्याच्या शुद्धतेची, ज्वेलर्सची माहिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवू शकता. तसेच, ज्या दुकानांमध्ये सोनं खरेदी करत आहात त्या दुकानांवर Bureau of Indian Standards चा लोगो आहे का हे तपासून घ्या.

Leave a Comment