Akshay Tritiya: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “काही शहरांमधील” बँका बंद

Akshay Tritiya: आजचा अक्षय तृतीयेचा दिवस महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडे साजरा केला जात आहे. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धी आणणारा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. साहजिकपणे आज बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येऊ शकते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 2024 च्या सुट्टीच्या नियोजनानुसार, या सणानिमित्त आज खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका बंद राहणार आहेत.चला मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या ठिकाणी आज व्यवहार सुरु असतील आणि कोठे बँका बंद ठेवल्या जातील…

मुंबई, पुण्यात बँका बंद नाही: (Akshay Tritiya)

RBIच्या सुट्टीच्या नियोजनानुसार, अक्षय तृतीयाच्या निमित्ताने देशातील काही निवडक शहरांमध्येच बँका बंद राहणार आहेत. मात्र यात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांचा समावेश नसल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बँका नेहमीप्रमाणे सुरळीत काम करतील, त्यामुळे तुम्ही जर का या शहरांमध्ये रहात असाल तर कोणत्याही अडचणींशिवाय तुमचे कामकाज सुरु ठेऊ शकता.

कोणत्या ठिकाणी बँका बंद?

आजच्या दिवशी बंगलोरमध्ये बसवा जयंती साजरी केली जाते, आणि त्यामुळे या दिवशी तिथल्या सर्व बँका आज बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील ज्या शहरांमध्ये बसवा जयंतीला महत्व आहे आणि जिथे बसवा साजरी केली जाते, त्या ठिकाणीही बँका बंद असण्याची शक्यता आहे(Akshay Tritiya). देशातील इतर काही शहरांमध्येही अक्षय तृतीयाच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. यामध्ये कलकत्ता, चेन्नई, दिल्ली यांचा समावेश होतो. मात्र, अहमदाबाद, जयपूर, हैदराबाद, भोपाळ यासारख्या शहरांमध्ये बँका सुरळीत काम करतील. तुम्हाला जर का या दिवशी सोन्याची खरेदी करायची असेल तर तुमच्या शहरातील बँका सुरु आहेत की नाही हे एकदा तपासून घ्या.

Leave a Comment