Air India Flights: Air India ने शुक्रवारी मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने हे निर्णय प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन घेतला असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय जाहीर केल्यानंतर एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले की ते सध्या परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि तेल अवीव येथून येण्या-जाण्यासाठी विमान तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशांना मदत करत आहेत.
Air India ची विमानं रद्ध: (Air India Flights)
Air Indiaने तेल अवीवसाठी तिकिट बुक केलेल्या प्रवाशांना पूर्ण रक्कम परत करण्याची किंवा दुसऱ्या एखाद्या तारखेला उड्डाण करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. प्रवासी या सुविधा मिळवण्यासाठी Air India च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा Air India च्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात.
इस्रायलमध्ये स्थिती बिकट का?
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे मध्य पूर्वेमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या रविवारी, इराणने इज्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता, ज्याला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इराणमधील अनेक लक्ष्ये वायुसेना हल्ल्याद्वारे नष्ट केली होती. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरही झाला आहे.
Air India व्यतिरिक्त, UAEची Etihad Airways, जर्मन विमान कंपनी लुफ्थासा आणि Amirates Airlines यांसारख्या अनेक विमान कंपन्यांनीही मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे उड्डाणे रद्द केली आहेत(Air India Flights). या परिस्थितीमुळे प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय आणि विमान कंपन्या प्रवाशांना अडचणींसाठी माफी मागत ते परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत.