Air India Express: प्रवासी आणि विमान कंपनी यांच्यातील वादाविवादाचा एक नवा अध्याय सोमवारी लिहिला गेला. टाटा समूहाच्या अंतर्गत असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस या सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत हवाई सफर करावणाऱ्या विमान कंपनीने मंगळवार आणि बुधवारी सामूहिकरित्या आजारी पडल्याच्या कारणावरून 30 जणांवर कारवाई केली आहे.
कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता: (Air India Express)
विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, “हे कर्मचारी ठरवून कामावर गैरहजर राहिले आहेत (premeditated and concerted absenteeism)”. या सामूहिक आजारीपणाचा परिणाम म्हणून 100 पेक्षा जास्त विमानांच्या उड्डाण रद्ध करवण्यात आली आणि सुमारे 15,000 प्रवासी त्रस्त झाले. Air India Express ने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त केली, तसेच आता कंपनीकडून प्रवाशांना पूर्ण रक्कम परत मिळणार असून त्यांना मोफत विमान तिकीट पुन्हा बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तणाव वाढण्याची शक्यता:
कंपनीने 30 कर्मचाऱ्यांची अचानक रवानगी केल्यामुळे Air India Express आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमान कंपनी आधीच वैमानिक आणि विमानसेवकांच्या कमतरतेचा सामना करत असून या थारमुळे उड्डाणांची व्यवस्था आणखी कठीण होऊ शकते. परिणामी एकूणच, Air India Express ची सद्यस्थिती चिंताजनक आहे.