Air India Express: विमान कंपनीने दिला प्रवाश्यांना दिलासा; मिळवा पूर्ण परतफेड किंवा पुढील विमानाचे बुकिंग

Air India Express: टाटा समूहाच्या अंतर्गत असलेल्या Air India ची उपकंपनी Air India Express च्या कारभारात मोठा विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने विमान कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रजेवर जाण्याच्या निर्णयामुळे काल म्हणजेच बुधवारी दिनांक 8 मे 2024 रोजी, 80 पेक्षा अधिक विमानांची सेवा रद्द करण्यात आली आणि यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता, या बरोबरच प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असल्याने आज कंपनीकडून त्यांना मिळणाऱ्या रिफंडबद्दल माहिती जाणून घेऊया.

विमानसेवेत अडथळा: (Air India Express)

Air India Express या विमान कंपनीकडून अचानक जाहीर करण्यात आलेली ही सामूहिक रजा कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचे द्योतक असल्याचे म्हटले जाते. विशेषत: Air Asia India शी विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा असंतोष व्यक्त केला जातोय अश्या चर्चा सुरु आहेत. अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या या विलीनीकरणामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीची सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितींबद्दल असंतोष आणि चिंता निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे.

काल अचानक विमान रद्द झाल्यामुळे Air India Express ने सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली, तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचीही ग्वाही दिली. एअरलाईन्सने प्रवाशांना कोणतेही दंडात्मक शुल्क न आकारता पूर्ण परतावा किंवा त्यांच्या तिकिटांची पुन्हा बुकिंग करण्याची सुविधा दिली जाण्याची माहिती देखील जाहीर केली आहे.

सरकारने खडसावले:

या विमान रद्द करण्याच्या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेत नागरी उड्डाण मंत्रालयाने (CAM) Air India Express ची त्वरित कानउघडणी केली. मंत्रालयाने एअरलाईन्सला कर्मचाऱ्यांच्या चिंतांवर तात्काळ उत्तर देण्याचे आणि अशा प्रकारचे विस्कळीतपणा पुन्हा होऊ न देण्यासाठी एक विशेष यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, CAM ने या घटनेवर विस्तृत अहवाल सादर करण्याचीही सूचना Air India Express ला दिली आहे.

रिफंड कसा मिळवाल?

लक्ष्यात घ्या विमान रद्द होण्याची कारणे कोणती आहेत यावर नुकसान भरपाई अवलंबून असते. जर विमान कंपनीच्या आंतरिक कारणांमुळे (Operational Reasons) विमान रद्द झाले असेल तर DGCA (Directorate General of Civil Aviation) च्या नियमावलीनुसार प्रवाशांना आर्थिक भरपाई मिळण्याचा प्रवाशांना अधिकार आहे आणि म्हणूनच Air India Express च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधून आपण परतफेड किंवा पुनर्बुकिंग करू शकता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फोन, ईमेल किंवा WhatsApp द्वारे देखील तुम्ही तुमच्या तिकिटाची पूर्ण परतफेड मागू शकता.

एयर इंडिया एक्सप्रेसची वेबसाइट – https://www.airindiaexpress.com/support

Leave a Comment