Adani Group: “सर्वोत्तम” बनण्यासाठी अदानींची तयारी; नक्की प्लॅन आहे तरी काय?

Adani Group: गौतम अदानींच्या नेतृत्वाखालील अदानी समूह भारतातील सिमेंट उद्योगात वर्चस्व गाजवण्याच्या मार्गावर आहे. हेच ध्येय साध्य करण्यासाठी अलीकडेच त्यांनी अंबुजा सिमेंट आणि ACC Limited या दोन्ही कंपन्यांचे अधिग्रहण केले, ज्यामुळे त्यांना भारतीय सिमेंट बाजारपेठेतील 20 टक्के हिस्सा मिळवण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

अदानी मैदान काबीज करणार? (Adani Group)

बाजारपेठेत स्वतःचे नाव सर्वांच्या पुढे नेऊन कोरण्यासाठी, ध्येयाच्या दिशने वाटचाल करण्याऱ्या अदानी समूहाने कामाची आखणी केली आहे. या महत्वाकांक्षी लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी, अदानी समूह अंबुजा सिमेंटच्या नफ्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर, कंपनीने 2028 पर्यंत दरवर्षी तयार होणाऱ्या सिमेंटच्या साठ्यात 16 टक्के वाढ करून 140 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्या, अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर असून अल्ट्राटेक सिमेंट हा त्यांच्या मार्गातील एकमेव मोठा अडथळा आहे. अदानी सिमेंटची सध्याची क्षमता 77.4 दशलक्ष टन असून, त्यात अंबुजा आणि ACC Limited यांचा समावेश होतो. देशभरात त्यांची 18 सिमेंट उत्पादन केंद्रे आणि 18 सिमेंट गाळणी आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी नुकतेच सांगी इंडस्ट्रीज लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे(Adani Group).

अदानी समूहाकडे चुनखडीचा मोठा साठा उपलब्ध आहे, जो सिमेंट उत्पादनासाठी आवश्यक मुख्य कच्चा माल असतो. सध्या ते अंबुजा सिमेंट उत्पादन खर्चात उत्कृष्ट व्यवस्थापन करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे, ज्यामुळे त्यांना स्पर्धात्मक लाभ मिळतो. या सर्व घटकांमुळे अदानी समूह भारतातील सिमेंट उद्योगात एका प्रमुख खेळाडू बनण्याची आणि येत्या काही वर्षांत बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.

Leave a Comment