1 Crore Wealth Creation Goal: आयुष्यात साधारण 1 कोटी रुपये जमवण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र, हे स्वप्न साकार करण्यासाठी गुंतवणुकीची योग्य रणनीती असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखिम पत्करण्याची तयारी असावी, सहनशीलतेसोबत आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असणे फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला दहा वर्षात कसे 1 कोटी रुपये कसे जमा करण्यात येईल याबद्दल कल्पना सुचवणार आहोत.
कोट्याधीश कसे बनाल? (1 Crore Wealth Creation Goal)
जोखिम पत्करू शकणार्या आणि 10 वर्षांत 1 कोटी रुपये जमवण्याचे ध्येय असलेल्या गुंतवणुकदारांनी Equity आधारित गुंतवणूक सुरु करावी, यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातीलMutual Fund मध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करता येते. हे महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी दर महिना 43,000 रुपयांची SIP (Systematic Investment Plan) सुरु करणे फायदेशीर ठरू शकते. जर तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तर त्या रकमेतूनही Equity Mutual Fund मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करू शकता.
SIP गुंतवणूक फायदेशीर:
SIP ची रक्कम वेगवेगळ्या Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, कोटक मल्टी कॅप फंड, निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड, HDFC मिड कॅप ऑपर्च्युनिटी फंड, HDFC फ्लेक्सी कॅप फंड, पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड आणि बंधन स्मॉल कॅप फंड यांच्यामध्ये SIP द्वारे समान रक्कम गुंतवणूक करून तुम्ही विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे विभाजित करू शकता. अशा प्रकारे विविधता आणल्याने जोखिम कमी होते आणि संभाव्य परतावा वाढतो. मात्र कोणतीही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसारच करा(1 Crore Wealth Creation Goal).